भारतीय हवामान खात्यानं शनिवार रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याच्या वारासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मराठवाडा आणि विदर्भात सोसाट्याचा वारा ताशी 40 ते 50 च्या वेगाने वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे. शेतकरी बांधवाना पिकाची आणि फळबागांची काळजी घेण्यास सांगितले आहे.
भारतीय हवामान खात्यानं शनिवारी, रविवारी, पुणे, अहमदनगर सातारा, नाशिक, बीड, छत्रपती संभाजी नगर, जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर सोलापूर, सांगली जालना, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट जारी केला आहे.